
“मुलांमध्ये प्रतीक गेडाम तर मुलींमध्ये वैष्णवी वानखडे प्रथम”
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा निमित्य जिल्हा स्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, आर डी आई के महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या गेली होती.
सदर स्पर्धेचे सुरुवात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे, डॉ. प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रो. अतुल पाटील, नरेश गिरपुसे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, श्री. अजय साखरे जिल्हा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्रा. नकुल देशमुख, प्रा प्रिती देशमुख श्री. प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या उपस्थिती मध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. सदर स्पर्धेयेतील प्रथम व द्वितीय विजेत्याला या महिन्यात होणाऱ्या राजस्तरीय स्पर्ध्ये साठी निवड झालेली असून ते त्या स्पर्ध्ये मध्ये भाग घेतील.या स्पर्ध्ये मध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय मधील रेड रि्बन क्लबच्या सदस्यांन सोबतच इतर विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवीला. या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रिती मोरे यांनी एच आई व्ही ची संक्रमाणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृती मध्ये युवकांची भूमिका फार महत्वाची आहे असे सांगितले. या वेळी या स्पर्ध्येचे नियम, मार्ग आणि मार्गदर्शन प्रा. अतुल पाटील यांनी केले. या स्पर्ध्ये मध्ये पुरुष गटातून प्रथम प्रतीक गेडाम आर डी आय के महाविद्यालय बडनेरा, द्वितीय जय पंचबुध्ये आर्टस् कॉमर्स आणि सायन्स कॉलेज अमरावती. तृतीय क्रिश राणे आर डी आय के महाविद्यालय बडनेरा यांनी तर महिला मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी वानखडे आर डी आय के महाविद्यालय बडनेरा, द्वितीय पायल मगर्दे केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती,
तृतीय स्नेहल चव्हाण तक्षशीला महाविद्यालय अमरावती यांनी मिळवले. सदर स्पर्ध्ये साठी पंच म्हणून प्रा. शुभम सोनोने, ललित गावंडे, ओम गेडाम, नागेश बेलकर, सलोनी लव्हाळे तसेच यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर संचालन श्री. प्रमोद मिसाळ समुपदेशक यांनी केले. या स्पस्पर्ध्ये करिता न्यू पंजाबी धाबा चे संचालक श्री हनी सिंग व एच आई व्ही साठी कार्यरत संस्था समर्पण ट्रस्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य मंडळ मोझरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, भाग्योदय शिक्षण व बहुउदशीय संस्था अमरावती, श्री सत्यदेव बाबा महिला मंडळ मोझरी यांनी सर्वाना T-शर्ट दिले. स्पर्धेयला यशस्वी करण्याकरिता लोकेश पवार, श्री. दामोदर गायकवाड, श्री. नरेश मंथापुरवार, श्री. किशोर पाथरे, श्री. प्रवीण म्हसाळ, श्री. अमोल मोरे, श्रीमती देवश्री राणे, श्री. मकसुद सौदागर, श्री. प्रमोद कळमकर, श्री. सूरज भोयर, श्री. सुनील अघम, श्री. श्याम वाहने, श्री. ब्रम्हानंद सावरकर, श्री. अजय वरठे, श्री. प्रवीण कळसकर, श्री. ईरफाण काझी, श्री. अमोल मोरे, श्री. नितीन बेदरकर, श्री. ब्रिजेश दळवी, श्री. राजेंद्र साबळे, श्री. राजेश तुपोणे, श्री. परमेश्वर मेशराम, श्री. मुकुंद इंदुरकर, श्री. नितीन पन्नासे, श्री. निखिल राऊत व श्री. निखील खंडारे, स्वप्नील इंगळे, प्रवीण पिंजरकर, श्रीकांत शेटे, यांनी अथक परिश्रम घेतले.