अपंगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांच्या निवास स्थान समोर अपंगांचे राहुटी आंदोलन.
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
अपंग जनता दल हि एक सामाजिक संघटना असून अपंगांच्या हक्का व न्यायासाठी सतत लढा देत असते अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती ची
जि.प. विश्राम गृह येथे एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत अपंगांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा त्या करिता. अपंगांच्या विविध मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जेष्ठ अपंग सेवक मा. श्री. सुधाकररावजी काळे यांच्या नेतृत्वात व अपंग सेवक मा. श्री. किसनरावजी इंगोले यांच्या मार्गदर्शनात आपले निवासस्थान मोरेश्वरलीला, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी अपंगांचे राहुटी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १) महाराष्ट्र राज्यातील अपंगांचे निराधार योजनेचे मानधन ६,०००/- रु. करण्यात यावे. २) राज्यातील १३ जिल्ह्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यासह अपंगांचे स्वतंत्र जिल्हा कार्यालय सुरु करण्यात यावे.३) जिल्हा नियोजन समितीमध्ये अपंगांसाठी राखीव असलेले १% निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शन सुचनेचे शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावे. ४) अपंग कल्याण आयुक्त पुणे यांची तात्काळ बदली करण्यात यावी. ५) राज्यातील अपंगांना अंत्योदय योजनेत व घरकुल योजनेत सरसकट समाविष्ट करण्यात यावे. ६) अपंग अनुशेष मधुन नोकरी मिळवलेल्या बोगस अपंगांची अपंगत्वाची फेर पडताळणी करण्यात यावी व फेरपडताळणी अंती कमी टक्केवारी मिळाल्यास सेवेतून वर्खास्त करण्यात यावे. ७) राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचात व ग्रामपंचायत मधील ५% निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी दिव्यांग मंत्री मा. अतुल सावे यांच्या निवास स्थान समोर अपंगांचे राहुटी आंदोलन करण्यात येत असून राज्यातील सर्व अपंगांनी जास्तीत जास्त संखेत उपस्थित राहावे. असे आव्हान अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव राजिक शाह यांनी केले. या बैठकीत राज्य महासचिव राजिक शाह, अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम, कांचन कुकडे, ज्योती देवकर, राहुल वानखडे, अजय बहूरवाघ, शुभम केदार, शेख शकील, किशोर नागदिवे, नासीर बेग, शेख रुस्तम, मो. राजिक, मो. इलियास, मुतलिक चाऊस, हिरालाल मुंद्रे, स्वींद्र धसकट, अक्षय विरखडे, शुष्मा भोजने, मोनाली गवई, ज्ञानेश्वरराव यावले व चंद्रशेखर भोंबे प्रामुख्याने उपस्थित होते. अशी माहिती एक अधिकृत पत्रा द्वारे राज्य महासचिव राजिक शाह यांनी दिली.

