
धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सांजाग्राम येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
महिला सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्रातून एकत्र झालेल्या समर्पण ही सामाजिक संस्था मागील अनेक वर्षापासूनसांझा ग्राम गुरुकुंज मोझरी येथे एकात्मिक विकास प्रकल्प राबवित आहे समाजातील उपेक्षित पुरुष,महिला व लहान मुली मुलांकरता समर्पण प्रतिष्ठान काम करते आहे.
धनश्री सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 6 जुलै रोजी सांजाग्राम येथे वृक्षारोपण, गरजू वस्तूची भेट हा अभिनव उपक्रम राबविला या उपक्रमात धनश्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजू ठाकरे, सचिव आरती बोंदरकर, अंबाई संस्थेच्या संचालिका माधुरीताई चव्हाण, धनश्री ग्रुपच्या सदस्य सारिका बढे, दिपाली महाजन, कविता कचवे, दिपाली पागृत आणि आश्रमातील छोटी मुल, मुली उपस्थित होते.