
संतोष गुप्ता यांचे घरी मध्यरात्री चोरी
तळेगाव दशासर / मो.शकील
तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम देवगाव येथे संतोष रामनारायण गुप्ता वय ३५ वर्ष रा. देवगाव यांच्या घरी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज असून ही बाब सकाळी सहा वाजताच्या सुमारास लक्षात येताच घरात असलेले संतोष गुप्ता यांच्या आई व वडील यांच्या निर्दक्षणात येताच त्यांनी यवतमाळ येथे राहत असलेल्या त्यांच्या मुलाला कळविण्यात आले. त्यांनी लगेच तळेगाव पोलीस ठाणे गाठून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.
व लगेच तळेगाव पोलिसांनी घटनास्थली जाऊन पंचनामा करून स्वानं पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. मिळालेल्या पोलीस माहिती नुसार सदर फिर्यादीच्या घरून साडे तीन तोळे सोने, चारशे ग्राम चांदी व दोन हजार रुपये रोख असा ऐकून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लांबवीला असल्याची माहिती आहे. यानुसार अज्ञात चोरा विरुद्ध अप. क्र. २८५, कलम ३०३ (२) बी ऐन ऐस नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार किरण औटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार विनोद राठोड, मनीष कांबळे करीत आहे.