विविध विषयाबाबत दिले निवेदन
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अवैध रेती व मुरूम उपसा करण्यावरून शासनाने ३ वर्षा अगोदर करोडो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून अद्याप त्याची वसुली करण्यात आलेली नाही. एकीकडे शासनाच्या विविध योजनांकरिता शासनाकडे पैशांची कमतरता असताना दंडवसुली न होणे म्हणजे गंभीर बाब आहे.धामणगाव तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाळूची वाहतूक सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने संपूर्णपणे डोळे झाक केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडालेला आहे. या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.चांदुर रेल्वे तालुक्यातील रायगड प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या शेतजमिनीचे अतिरिक्त भूसंपादन मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहे. सदर भूसंपादनासाठी लागणारा निधी शासन दरबारी जमा असून देखील सदर शेतकऱ्यांना तो वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून या प्रकरणी तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी केली. अशीच परिस्थिती चांदी, साखळी, आजणी, लोअर वर्धा या प्रकल्पातील शेतकऱ्यांची आहे.रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची मजुरी, शासकीय मंजुरात असलेल्या विहिरीच्या कामावरील रोजगार हमीचे पैसे तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे मागील काही महिन्यांपासून न आलेला पगार या विविध बाबींवर आयुक्त व कमिश्नर यांना तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.शासनातील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही सामान्य माणसांच्या अडचणी सोडवल्या जात नसतील तर मग अश्यावेळी सक्तीने पेश येणे हाच एकमेव मार्ग उरतो. यासाठी विरोधक खोटी बदनामी करत असतील तरी त्याने मी थांबणार नाही. लोकांसाठी माझा लढा सुरूच राहील.


https://t.me/s/Top_BestCasino/125