तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचे लाभ मंजुरीबाबत दिलेल्या शाश्वतीनुसार तात्काळ आदेश काढा
अन्यथा १५ दिवसानंतर साखळी आमरण उपोषण करू
मोर्शी/संजय गारपवार
उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला डॉ. शुशिलकुमार वाकचौरे साहेबांची महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.वाकचौरे साहेब नव्याने रुजू होवून प्रथम भेट असल्याने त्यांचा व मुख्य प्रशासकीय अधिकारी खडसे यांचा संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर निवेदन देऊन अकोला मंडळातील हिवताप कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित मागण्यावर चर्चा केली.सातव्या वेतन आयोगामध्ये शासनाने सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी १०,२०,३० वर्षे सेवा झाली त्याचे करिता तीन लाभाच्या योजना मंजूर केली असतांना सेवानिवृत्त कर्मचार्यांना तिसरा लाभ अद्यापही मंजूर केलेला नाही. राज्यातील अकोला व्यतिरिक्त इतर सहाही विभागामध्ये लाभ मंजूर केलेले आहे.याबाबत २३ जुलैला तत्कालीन उपसंचालक यांचे सोबत संघटनेचे शिष्टमंडळाने चर्चा केली.

त्यांनी ७ दिवसात कार्यवाही करण्याचे मान्य केले असता अद्यापही त्यावरील कार्यवाही प्रलंबितच आहे.राज्यातील नाशिक कोल्हापूर नागपूर औरंगाबा,लातुर या मंडळातील सेवेतील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अकोला विभागातील कर्मचाऱ्यांना सदर लाभ त्वरित मंजूर करण्यासाठी संघटनेकडून आग्रह धरण्यात आला. तसेच हिवताप विभागातील पदोन्नती साखळीतील आरोग्य सेवक या संवर्गामधुन आरोग्य निरिक्षक व क्षेत्र कर्मचारी संवर्गातुन आरोग्य कर्मचारी या पदावरिल पदोन्नतीची प्रकरणे दिवाळी पुर्वी निकाली काढण्यात यांवे. वेतन त्रुटी समितीचे शिफारशी प्रमाणे २ जुन २०२५ चे शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरिक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या संवर्गाचे वेतनश्रेणी मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या फेर वेतन निश्चिती करुन कालबद्ध पदोन्नतीचे प्रकरणासह सर्व लाभ मंजूर करण्यात यावे. सेवानिवृत्त कर्मचार्याचे प्रकरणे त्वरित निकाली काढने,विभागातील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे स्तरावरील प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी संबंधित कार्यालयाला निर्देश देण्यात यावे. अशी मागणी निवेदन देवुन करण्यात आली. यावर १५ दिवसामध्ये निर्णय व्हावे अशी संघटनेकडून विनंती करण्यात आली. अन्यथा नाइलाजाने संघटनेचे नेतृत्वाखाली संस्थगीत केलेले सामुहिक आमरण उपोषण करणे भाग पडेल. अशी वेळ संघटनेवर येणार नाही अशी शाश्वती मा. उपसंचालक महोदयांनी दिली. याबाबत संघटनेकडून त्यांचे आभार मानले.आजच्या बैठकीत संघटनेचे शिष्टमंडळामधे प्रदेश सरचिटणीस डॉ. डी.एस.पवार, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष एन.डी.जाधव, डॉ.एस. सी.माणिकपुरे, पी.के.भोकरे, पी.डब्ल्यु श्रीराव , डी एस डोंगरे एस. एल. माकोडे अब्दुल जावेद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://t.me/s/Top_BestCasino/142