
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
सततची नापिकी आणी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ( दि. 5) रात्री नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील पापळ या गावी मृतकाच्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. चि. गौरव रामदास कथले ( वय 25) असे शेतकरी युवकाचे नाव आहे.पापळ गावातील हा युवक मागील काही दिवसांपासून त्याच्यावर असलेले कर्ज आणी सततच्या नापीकीमुळे चिंताग्रस्त होता . 5 वर्षांपुवी त्याच्या वडिलांचं निधन झाल होत. वडिलांचा हाथ डोक्यावरून गेला आणी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली होती .त्याच्याकडे शेती 2 एक्कर च असल्यामुळे कुटुंबाचं भागत नव्हतं जबाबदाऱ्या खूप वाढल्यामुळं शिक्षण सोडावं लागलं मजुरी करून कुटुंब जगवायचं आणी कर्ज काढून शेतीला लावायचं पण सतत च्या नापीकीमुळे त्याला शेतीची साथ मिळाली नाही ..आणी एवढंच नाही तर त्याला पॅकेज मंध्ये विहीर मिळाली पण बांधायला जवळून बाहेरून कर्ज काढून त्याने विहीर बांधली विहीर बांधून होऊन सुद्धा त्याला त्या विहिरीचे पैसे अजून सुद्धा मिळाले नाही … त्यामुळे तो खूप कर्ज बाजारी झाला म्हणून मानसिक तणावाखाली होता .मंगळवारी (दि.5.) संध्याकाळी 6 च्या सुमारास घरून बाहेर पडला . घरी लवकर न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला … तर संध्याकाळी 8 च्या सुमारास त्याच्या स्वतःच्या शेतामंध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबियांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली .त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. त्याच्या पश्च्यात त्याला आई व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.