
एकीकडे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती तर दुसरीकडे वीज पुरवठा होतो वारंवार खंडित
स्मार्ट मीटरची सक्ती करु नये यासाठी युवासेना आक्रमक
दर्यापूर / तालुका प्रतिनिधी
दर्यापूर महावितरणचा अजब कारभार उघडकीस येत असून जुने वीज मीटर काढून नवी स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती ग्राहकांना वीज वितरण कर्मचारी याकडून होत आहे.या नवीन स्मार्ट मीटरमुळे मोठ्या प्रमाणावर वीज बिल येत असून यामुळे नागरी नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे.तर दुसरीकडे वीज पुरवठा होतो वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागतो आहे.तरी स्मार्ट मीटरची ग्राहकांना सक्ती करु नये, तसे केल्यास रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत विज मीटर सक्ती बाबत असा आक्रमक पवित्रा युवासेना दर्यापूर तालुका यांच्या वतीने घेण्यात आला असून त्याबाबत वीज वितरण विभाग दर्यापूर यांना शिवसेना संपर्कप्रमुख अमरावती जिल्हा गजू पाटील वाकोडे,युवा सेना जिल्हाप्रमुख पितेश अवघड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुकाप्रमुख संतोष ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी युवासेना तालुका संघटक अमित कांबे,उपतालुका प्रमुख भूषण राऊत, अमन भदे, विकास साखरे, सतीश कुटेमाटे, सर्कल प्रमुख दीपक मुगणे, सोपान नरोकार, बंटी गोळे, तुळशीदास साखरे,गणेश अमलकर, मंगेश सांगोले, सोपान मानकर, मुबारक अली,अमोल गावंडे, नितीन भदे,वैभव देशमुख, रविंद्र खाळे, अजय कडु, विलास जामनिक, धीरज तराळ, गणेश देशमुख, तेजस शिंदे,शिवम ढोरे, दर्पण टाले, भूषण गोठे, ओम बारस्कर, शरद कीलोर, दिनेश तेलंग निलेश गावंडे, निरंजन पानझाडे, दीपक डायलकार,आदी युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.