
- रोख व जुगार साहित्य जप्त
दर्यापुर / तालुका प्रतिनिधी
दर्यापुर शहरातील बनोसा परिसरातील ‘गप्पा गोष्टी हॉटेल’ येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दर्यापुर पोलीसांनी अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये ५२ ताश पत्त्यांवर सुरू असलेल्या एक्का-बादशहा प्रकारच्या जुगार खेळात गुंतलेले सहा जण रंगेहात पकडले गेले असून काही जण पोलीसांची चाहूल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी या कारवाईत एकूण १,००,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई दिनांक २९ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. दर्यापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.शेख वसीम शेख हसनु (वय ३२) – व्यवसाय: मजुरी, रा. जसपुरा, प्लॉट, खोलापुर, ता. भातकुली, जि. अमरावती,विनोद सुरेशराव चौधरी (वय ३९) – रा. जुनी तहसील जवळ, दर्यापुर, मोहम्मद इर्शाद अब्दुल रशीद (वय ४३) – रा. जसपुरा, खोलापुर, ता. भातकुली, जि. अमरावती,भुजंग रमेश गुळवे (वय ३८) – रा. जळमकर कृषी इंडस्ट्रीज, बाभळी, दर्यापुर,रुषीकेश संजय जळमकर (वय ३५) – रा. गांधी नगर, बनोसा, दर्यापुर,सागर उर्फ सोनू अरुण गावंडे (वय ४३) – व्यवसाय: शेती, रा. राठीपुरा, बनोसा, दर्यापुर पोलीसांनी ५२ ताश पत्ते, रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य घटनास्थळावरून जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेची किंमत १,००,०२०/- रुपये आहे.ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या पथकात पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, पोउपनि रोहित सोनटक्के, पोकों निवृत्ती बरगट (ब.नं. ३०७), पोकों सचिन जाधव (ब.नं. १५६२) व नापोकों चालक अनिल आडे (ब.नं. १९२१) यांचा समावेश होता.दर्यापुर पोलीस ठाण्याच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी यापुढेही अशा प्रकारच्या कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.