
भंडारा / प्रविण भोंदे
कविता आणि दिनेश ( काल्पनिक नाव ) दोघेही एकाच गावात राहणारे. दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होते दोघांनी सन 2023 मध्ये प्रेमविवाह केला . दोघांचे वैवाहिक जीवन सुंदर फुलू लागले . त्यांचे आयुष्यात एक सुंदर गोंडस परी रूपाने एक मुलगी जन्माला आली . ती आता दीड वर्षाची आहे . पती पत्नी व मुलीसह त्या दोघांचे वैवाहिक जीवन सुरेख सुरु असताना जुलै महिन्यात पत्नी ही फोनवर ती बोलताना पतीला दिसली असता पतीने त्याबाबत विचारणा केली. पत्नीने सांगितलेले उत्तर पतीला समाधानकारक न वाटल्याने तो परत्नीवर संशय घेऊ लागला. त्याच दरम्यान त्याने आपल्या पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन शिवीगाळ करणे, मारझोड करणे सुरू केले.एके दिवशी पत्नीस मारपीट करून जिवे मारणार अशी धमकी दिल्याने पत्नी खूप घाबरुन जाऊन तिने भंडारा पोलिस स्टेशन येथे पती विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर नमूद प्रकरण भंडारा पोलीस यांनी भरोसा सेल येथे पाठविण्यात आले. दोघेही पती पत्नी यांना भरोसा सेल येथे दोन-तीनदा बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.पत्नीस मारहाण करू नको, तीचे तब्बेती कडे लक्ष देऊन तिचा औषधोपचार करण्याबाबत समजवण्यात आले. पतीला पत्नीवर कश्यामुळे संशय येतो याबाबत त्यांचे समुपदेशन करण्यात आले.त्यानंतर पती पत्नीने एकमेपासून वेगळे न होता एकत्र राहण्याचा निर्णय घेऊन झगडा भांडण न करता सोबत आता गुनागोविंद्याने राहत आहेत.