अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथे सती श्री संत शांतामाई यांचा प्रथम पुण्यस्मरण महोत्सव संपन्न झाला असुन या सोहळ्या निमित्त पंचम दिवसीय संगीतमय शिव तत्त्वज्ञान महायज्ञ दिनांक 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रोजी कथा प्रवक्ते गुरुवर्य श्री श्री 10008 धर्मभूषण स्वामी कृष्णकांतनंद पुरीजी महाराज शिंदी आश्रम यांच्या मंत्रमुग्ध सुमधुर वाणीतून करण्यात आला महाराज्यांच्या मते शांताई ही एक संत नसुन आदिमाया शक्तीचा अवतार आहे.एवढी अपार शक्ती दहिगाव रेचा येथे अवतरली होती अनेकांचा उध्दार केला आणि शेवटी आपला देह त्यागून दिला , समाधिस्त झाली आपल्या गावा साठी आपल्या वर जिवापाड प्रेम करणाऱ्या लेकरांनी साठी नेहमीच टाहो फोडला,संताचे शरीर जरी या निसर्ग रुपी क्षेत्रातून विरहित झाले तरी त्यांचे विचार आचार आणि त्यांची शिकवण कधीच विरहित होत नाही तर उलट त्यांना रहित ठेवतात एवढी शक्ती ईश्वराने त्यांना दिलेली असते आणि आज जर या भारत देशात संत किंवा संताचे विचार नसते तर कल्पना तुम्हीच करा भारत देशाची संस्कृती राहली असती काय! नाही संपूर्ण जगातून महादेवाला च देवांधी देवा ची उपाधी आहे म्हणजे सज्जनो या मातीत देव आणि संताचा निवास आहे.असे एक ना अनेक शिव पुराणातील माहिती या निमित्त सर्व भक्तांना गुरूवर्य 10008 स्वामी कृष्णकांतनंद पुरीजी महाराज यांनी या कार्यक्रमा संबोधन केले तसेच दैनंदिनी कार्मक्रम सकाळी काकडा,हरिपाठ,नित्यानंद साधना,तसेच परिवर्तनी एकादशी दिवशी पालखी सोहळा तर दुसऱ्या दिवशी दिनांक 4 सप्टेंबर रोजी काल्याचे कीर्तन महंत श्री 108 स्वामी सुरेश्वरा नंद गिरी उपाख्य दासगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच ग्रामगीताचार्य श्री मनोहर दादा रेचे सुदाम दादा सावरकर साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त व देश भक्त सैनिक सतीश शामराव कांबळे दहिगाव रेचा यांचा भव्य सत्कार स्वामीजींच्या हातून करण्यात आला तर या कार्यक्रमाला स्वामी श्री गंगेश चैतन्य जी महाराज दहिगाव,साध्वी सुश्री निजात्मातीर्थ गरजधरी आश्रम, साध्वी सुश्री स्नेहकांता दीदी पुरीजी शिंदी आश्रम,साध्वी सुश्री स्वयंप्रभा दीदी अकोट,ह.भ.प. रामदास महाराज गायगोले, ह.भ.प.भागवताचार्य देवेंद्र महाराज रेखाते श्री क्षेत्र श्रद्धासागर आकोट सहीत सर्व दहिगाव रेचा येथील नागरिक उपस्थित होते.
