
विविध उपक्रम पाहुण शाळेचे केले कौतुक
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त जि प शाळा दाभा येथे भेट दिली.
शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून शाल,श्रीफळ, रोपटे व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत उपक्रम व शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी पुस्तक परिचय, इंग्रजी रोल प्ले,कृतियुक्त कविता गायन, अभिनय असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सादर केले. जिल्हाधिकारी यांनी शाळेतील अस्ट्रॉनॉमी लॅब व त्यातील विविध साहित्य व प्रयोगची पाहणी केली.
आणि शाळेतील शिक्षक अंकुश गावंडे यांनी राबविलेल्या ICT कॉर्नर उपक्रम अंतर्गत अलेक्सा, एआर, विआर अशा विविध तंत्रज्ञानातून गुणवत्ता विकास होणाऱ्या उपक्रम ची पाहणी केली व प्रात्यक्षिक करून पहिले. सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त व नावीन्यपूर्ण आहे असे सांगून या उपक्रम चे कौतुक केले.एकंदरीत शाळेची गुणवत्ता, शालेय उपक्रम, स्वच्छता, भौतिक सुविधा या बाबतीत समाधान व्यक्त केले व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.आपल्या प्रतिक्रिये मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगाव खंड तहसीलदार आश्विनी जाधव, गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शैलार, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, गावच्या सरपंच सौ अर्पिताताई वाठ, शा व्य स अध्यक्ष इम्रान मिर्झा, केंद्रप्रमुख भूषण बागडे व प्रविण मेहरे तसेच मोठया प्रमाणात पालक व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरुणा घुगे, सविता देशमुख, उषा सातपुते, मीना हरणे, सुधीर नाचणकर, संगीता सोळंके, अंकुश गावंडे व उज्वला बेहरे यांनी परिश्रम घेतले.