सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली/ प्रतिनिधी
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना एकूण ७५२ मतांपैकी पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या मुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
