
तहसीलदार यांना दिले निवेदन
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
दि. 21 जुलै 2025: महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर व नागरी हक्कांवर गदा आणणारा आहे. या अन्यायी कायद्याविरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटी, नांदगाव खंडेश्वर यांच्यावतीने दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता,तालुका अध्यक्ष निशिकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालय कार्यालय, नांदगाव खंडेश्वर येथे एका मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांसह निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शासनाच्या या जाचक अध्यादेशाची होळी करून काँग्रेस पक्षाने आपला तीव्र निषेध नोंदवला.
या प्रसंगी मा. तालुका अध्यक्ष निशिकांत जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “हा कायदा सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा आहे. काँग्रेस पक्ष या कायद्याविरोधात ठामपणे उभा असून, नागरिकांच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देईल.” यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत कायद्याचा तीव्र निषेध केला. निवेदन सादर करताना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी एकजुटीने शासनाच्या या कायद्याविरोधात आपला संताप व्यक्त केला.काँग्रेस पक्ष सर्व नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना आवाहन करतो की, या कायद्याविरोधात एकजुटीने आवाज उठवावा आणि लोकशाही तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे. पक्षाने शासनाला या कायद्याला तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष निशिकांत जाधव, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भगत,यांचेसह मनीष सावदे,गौतम सोनोने,रमेश ठाकरे,ज्योतिपाल चवरे,गजानन मारोटकर,सुनील शिरभाते,प्रफ्फुल कापडे,देवेंद्र सव्वालाखे,शेख हारून शेख युसूफ,राजुभाऊ जाधव,दीपक सवाई,धनंजय वानखडे,गजानन जवळकर,आशिष कडू,अर्पित काकडे,शिवाजी चव्हाण,उमेश दहातोंडे,विशाल रिठे,डॉ संजय जेवडे, हरिभाऊ जेठे,मोरेश्वर दिवटे,इंद्रिस भाई,सुशील थोरात यांचेसह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.