अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले.डॉ. मनीष गवई हे सामाजिक न्याय मंत्रालयाचे खासगी सचिव, भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराचे मानकरी तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष निमंत्रित सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. या प्रसंगी त्यांनी ना. रामदास आठवले यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, युवक विकास आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिक प्रभावी काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
