घाटलाडकी येथील आरोग्य केंद्राच्या इमारती लोकार्पनाला दोन वर्षांपासून ग्रहण
घाटलाडकी / मनोज बारस्कर
चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळा होऊन जनतेच्या सेवेसाठी अर्पित करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने शोक संदेशाची पत्रिका तयार करून इमारतीचे लोकार्पण आंदोलन दिनांक २१ रोज सोमवारी ११ वाजता करणार असल्याचे या पत्रिकेत नमूद केले आहे,
या शोक संदेशाची पत्रिका सोशियल मीडियावर धुमाकूळ घालत असून चर्चेचा विषय बनली आहे गेली दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार झाली आहे वारवार निवेदना मार्फत विनवणी करूनही प्रशासन व पुढऱ्यांना लोकार्पण करण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेदण्यासाठी लोकार्पण आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे, या आंदोलना वेळी दर्यापूर आमदार गजानन लवटे , युवा सेना पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख उपस्थित राहणार असल्याचे या पत्रिकेत म्हटले आहे या अनोख्या आंदोलनाला गावकर्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
घाटलाडकी सह लगत असलेल्या गावातील रुग्णाचे हाल होत आहे, गेली दोन वर्षांपासून इमारत उभी असताना प्रशासनाला व पुढाऱ्यांना लोकार्पणासाठी वेळ मिळत नाही नागरिकांच्या आरोग्या विषयी प्रशासन गंभीर नसल्यामुळे आम्ही लोकार्पण करण्याचा पवित्रा घेतला आहे
रोशन जयसिंगपूरे,युवा सेना तालुका प्रमुख.