
चांदुर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे यांची उपस्थिती
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
नगरपरिषद चांदुर रेल्वे अंतर्गत येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी डेक्स बेंच वाटप व शाळा प्रवेशोत्सव चांदुर रेल्वेच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या फोटोची पूजन करून हरार्पण पण करण्यात आले.यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी डेक्स बेंच उपलब्ध करून देण्यात आले.यावेळी तहसीलदार पूजा माटोडे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, खाजगीकरणाच्या तुलनेत नगरपरिषद जिल्हा परिषद शाळा कशा सुसज्ज करता येतील व शैक्षणिक दर्जा कसा सुधारेल याकडे शिक्षकांनी व पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमासाठी शहरातील विजय मिसाळ, माजी नगरसेविका कल्पना लांजेवार,कृष्णाजी पडोळकर, संजय बाबर, चेतना राऊत, सोनू चौधरी, महादेव शेंद्रे,मंगेश भोसलेमनीष कुकटकर, वैशाली वानखडे, सुदर्शन सोनोने उपस्तित होते.कार्यक्रमाचे संचालन वैशाली कोरडे तर प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन नंदनवार यांनी केले.