
पालकमंत्री कार्यालयाची दखल..
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर ते दिघी महल्ले रस्ता ते जिल्हा सीमेपर्यंत रस्ता प्रजिमा – ३७ किमी दिघी महल्ले गावा जवळील भागामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याची पाइप लाइनचे काम सुरू होते,
या पाईप लाइन वर टाकलेल्या माती मुळे संपूर्ण रस्ता हा काळया माती मुळे अत्यंत खराब झाला होता….यामुळे अनेक दुचाकी वाहनाचे अपघात झाले…शाळेतील विद्यार्थी ना सुधा जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माणात होत.
या संदर्भात गावातील लोकांनी व विद्यार्थिनी तक्रार पालकमंत्री कार्यालयात केली असता कार्यालय तर्फे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या असता.
बांधकाम विभागाने दखल घेत थेट 24 तासात काळया मातीने चिखल झालेल्या रस्ता.मोकळा करून दिला.यावेळी पालकमंत्री कार्यालय चे गावकरी व विद्यार्थिनी आभार मानले.