नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
गट ग्राम पंचायत खेड पिंपरी येथे मुख्यमंत्री समृध्द ग्राम पंचायतराज अंतर्गत शासन निर्देशांनुसार विकास कामांची ग्राम सभा दिनांक 17/9/2025 रोजी आयोजित केली होती, या ग्राम सभेचे आयोजन सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या उपस्थितीत बहुसंख्य महिला पुरुष व शासकीय नीम शासकीय कर्मचारी अधिकारी उपस्थित होते, ग्राम सभेचे उद्दिष्ट्ये ग्रामीण भागातील विकास व राज्ये स्तरीय विभागीय स्तरीय जिल्हा स्तरीय व पंचायत समिती स्तरावर विकास प्रतियोगिता मध्ये भाग घ्यावा या करीता महत्त्वाची भूमिका या ग्राम सभेचे प्रमुख उद्देश होता, व या ग्राम सभेचे उद्घघाटन महाराष्ट्राचे मा ,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने होणार होते,त्याअनुषंगाने खेड पिंपरी ग्रामपंचायत कार्यालय खेड पिंपरी येथे स्क्रीन टीव्ही चे आयोजन करून मोठ्या थाटात तयारी केली असता,jio नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाची लिंक निष्क्रीय ठरली ऑनलाइन प्रेक्षपण अभावी खेड पिंपरी येथे मा ,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागले, ऑनलाइन प्रेक्षपण निष्क्रीय ठरले व Jio नेटवर्क नसल्याने संपूर्ण ऑनलाइन ग्राम सभा उद्घाटनाचा बट्ट्याबोळ झाला, संपूर्ण गावातील गंभीर समस्या दूर करण्यासाठी सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी Jio नेटवर्क सुविधा करीता 15/9/2025 ऑगस्ट ला पारित ग्राम सभा ठराव Jio टॉवर बसविण्याबाबत सर्वानुमते मंजूर करण्यात आला, व Jio कार्यालय अमरावती येथे ऑफ लाइन स्वरूपात प्रस्ताव सादर करूनही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली, व आश्वासने दिली होती,

परंतु कुठलाच ठोस निर्णयाबाबत कार्यवाही बाबत अवगत केले नाही, या करीता खेड पिंपरी येथे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे, कंपनीद्वारे फसवणूक होत आहे, मनमानी रिचार्ज रक्कम ग्राहकांवर लादून सुविधा मात्र शून्य आहे, मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या उद्घघाटन सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण होऊ शकले नाही करीता Jio नेटवर्क सुविधा पुरवण्यास निष्क्रीय आहे, असे ग्राम सभे मधे निष्पन्न झाले, गंभीर परिस्थिती मधून Jio कंपनी नेटवर्क उपलब्धता कधी करणार असा प्रश्न नागरिकांना भेडसावला आहे,सिम कार्ड दुसऱ्या कंपनी चे वापरू असे उपस्थितीमध्ये चर्चा करण्यात आली, ग्राम सभेला तलाठी पडसपगारे तलाठी बसवनाथे कृषी सहायक माहूरे, आशा वर्कर नंदा साठे, अंगणवाडी सेविका सत्यवती चोरे, महिला बचत गट समूह दिनेश गिरी कृषी ऊ, बाजार समिती, कर्मचारी,शिक्षक एक दिवसीय ग्राम पंचायत अधिकारी म्हणून मुख्याध्यापक बलदेव घुगे अध्यक्ष सरपंच मंगेश हंसराज कांबळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्राम सभेला उपस्थित होते,
