
ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
माहूर/ संजय घोगरे
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर ग्रामीण रुग्णालय येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन गोपू उर्फ सागर महामुनी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. एकूण ५६ रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले, हे विशेष उल्लेखनीय आहे.या कार्यक्रमाला खालील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.साईनाथ महाराज,संजय कान्नाव,डॉ. वाघमारे साहेब,PI कराड,शहराध्यक्ष व नगरसेवक सागर महामुने,तालुकाध्यक्ष नीलकंठ मस्के,माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,नंदकुमार जोशी,विजय आमले,अनिल वाघमारे,विलास पाटील चौधरी,विनायक मुसळे,मनीष राठोड,संजय राठोड,डॉ. मेंडके,श्याम कुमरे,अविनाश भोयर,अशोक जोशी,स्वाती आडे,पद्माताई गिरे,प्रतिभा पाटील,जयकांत मोरे पाटील,विशाल खरे,किशोर आत्राम,निलेश तायडे,पवन चौहान,कैलास फड,अर्चना दराडे,या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा आदर्श उभा राहिला असून, रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवले जातील,हे निश्चित.सागर महामुने आणि त्यांच्या टीमचे या सफल आयोजनासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.या प्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन अत्यंत प्रभावीपणे पार पडले.हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी सर्व उपस्थितांची भावना होती.