
परिसरातील महिलांनी अभियंता याना घेराव घालत दिले निवेदन
परिसरातील महिलांची लोकप्रतिनिधी बद्दल नाराजी
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
शहरातील महारुद्र नगर परिसरातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून नागरिक महिलांना या रस्त्यावरून ये जा करणे कठीण झाले आहे, कच्च्या रस्त्याच्या या दयनीय अवस्थेला घेऊन या परिसरातील महिलांनी गुरुवार रोजी नगरपरिषद येथे अभियंताला घेरा घातला निवेदन दिले,यावेळी मुख्याधिकारी मात्र कार्यालयात गैरहजर आढळले,तर महिलांनी लोकप्रतिनिधी बद्दल नाराजी व्यक्त केली,शहरातील महारुद्र नगर हे वर्दळीचे परिसर असून या ठिकाणी लहान मुलांची शाळा सोबत अनेक कॉलनी बनल्या आहे, या परिसरातील नागरिक नगर परिषदला अनेक कर भरतात, मात्र नगर परिषदे कडून या परिसरात रस्ते सुद्धा बांधण्यात आले नाही,दरवर्षी या कच्च्या रस्त्यावर नगरपालिके कडून मुरूम टाकण्यात येते, पावसाळ्यात हे रस्ते अतिशय चिखलमय होत असून या रस्त्यावरून दुचाकी सुद्धा जीव मुठीत घेऊन चालवावी लागते, कित्येकदा या परिसरातील नागरिकांची दुचाकी स्लिप होऊन अपघात झालेले आहे, परिसरातील नागरिक या समस्याला घेऊन दरवर्षी नगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले,तरीसुद्धा नगरपालिका किंवा लोकप्रतिनिधी कडून याची ही दखल घेण्यात आली नाही,म्हणून परिसरातील महिलां नागरिकांनी नगरपालिका अभियंताला घेरावा घालत त्यांच्या ह्या समस्या मांडल्या.