अमरावतीच्या कलाकारांना राष्ट्रीय पातळीवर संधी देणार
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती हा कलेचा वैभव असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने आपले सांस्कृतिक वैभव जिवंत ठेवले असून येथील कलाकार या संस्कृतीचा वारसा जोपासत आहे.त्यामुळे येथील कला राष्ट्रीय व स्तरावर गाजलेले असल्याने अमरावतीच्या स्थानिक कलावंत या कलेचे कार्यवाहक आहेत. टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने अमरावतीच्या कलावंतांना राष्ट्रीय पातळीवर संधी देऊन अमरावतीच्या कलाकारांच्या कलेला वाव देणार असल्याचे प्रतिपादन छप्परी मराठी चित्रपटाचा मुहूर्त प्रसंगी अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांनी केले.

ते अमरावतीच्या स्थानिक कलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी आणि विदर्भ नगरीतील विशेष करून अमरावतीच्या कलावंतांच्या कलेला रुपेरी पडद्यावर उभारण्यासाठी टीम झेनिथ फिल्म्स एंटरटेनमेंट, स्ट्रॅमिन्ग बॅक स्टुडिओजच्या संयुक्त विद्यमाने छप्परी मराठी चित्रपटाचा मुहूर्त प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अभिनेते एम.टी.नाना देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून टीम झेनिथचे सांस्कृतिक प्रमुख व छप्परी मराठी चित्रपटा चे निर्माते मिथिल कळंबे, विराग जाखड, प्रवीण इंदू, सिद्धांत सकसुले, सिनेमा निर्माते मनोज बख्तर, संपादक विजय गायकवाड, कदम, चंदा वानखडे, प्रतिभा पवार, वसंत उके, वर्धेचे जिल्हा महिती अधिकारी मंगेश वरकड, प्रा विशुद्धानंद जवंजाळ ,डॉ. निर्मल सरदार, चित्रपट निर्माता इंजि मिलिंद काहळे, युवा स्वाभिमानाचे नितीन बोरेकर, जेष्ठ कलावंत करुणा कदम, इंजि प्रतिभा पवार यवतमाळ अवर्जुन उपस्थीत होते.छप्परी मराठी चित्रपताचा मुहूर्त डॉ मनीष गवई यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आला अमरावतीच्या चांदुर रेल्वे रोड वरील वाघा माय मंदिराच्या परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आपले उदघाटकीय मनोगत व्यक्त करताना डॉ गवई म्हणाले की अमरावती हा कलेचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक नामवंत कलाकारांनी येथील कला जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. छप्परी मराठी चित्रपटाचा निमित्ताने अमरावतीच्या कलावंताच्या रूपाने अमरावतीच्या मातीला कला क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होईल.सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अमरावतीचे नाव जागतिक स्तरावर गाजलेआहे ही अमरावतीची गौरवशाली परंपरा आहे आणि हा अमरावतीचा गौरव सुद्धा आहे. या शहराचा गौरवशाली इतिहास आहे. या शहरातुन अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले.अमरावतीच्या कलाकारांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. कला ही मानवी जीवनामध्ये चैतन्य भरणारी कला आहे कलेच्या माध्यमातून कलावंतांना आत्मविश्वास येतो आणि आनंद देखील मिळतो. कला ही तपश्चर्या देखील आहे. तिला मिळवण्याकरिता तिची मनापासून साधना आराधना करावी लागते.अमरावती जिल्ह्याने आपले सांस्कृतिक वैभव जिवंत ठेवले असून येथील कलाकार या संस्कृतीचा वारसा जोपासत आहे.त्यामुळे येथील कला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली असल्याने अमरावतीचे स्थानिक कलावंत या कलेचे कार्यवाहक आहेत.अशाच कलाकारांना या चित्रपटाच्या निमिताने काम करण्याची आणि रुपेरी पडद्यावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.या चित्रपताचा मुहूर्त प्रसंगी शिवम चावरे,सुहानी ठवळे, जिज्ञासा पाढेन, श्रुती गुल्हाने, आरुषी गावंडे, सायली वर्धे, आकांशा नंदेश्वर, अंजली पाटील, वैष्णवी कापले, आदी चित्रपट कलाकार उपस्थित होते या चित्रपटात सहभागी होण्यासाठी अमरावतीच्या कलाकारांना शेवटची संधी झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने देण्यात येत असून कलाकारांनी तात्काळ ९३७०१००८९८,९३७०१५२२७७वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
