सामाविष्ट करण्यासाठी माजी आमदार विरेंद्र जगताप नेतृत्वात शेतकऱ्यांचा तहसील कार्यालय ठिय्या आंदोलन
चांदूररेल्वे /तालुका प्रतिनिधी
राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 31 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मा. मुख्यमंत्री यांनी 7 ऑक्टोंबर रोजी दिली होती. याचा शासन निर्णय आज 9 ऑक्टोंबर रोजी निर्गमित झाला असुन यामधून चांदूर रेल्वे तालुका वगळण्यात आले परंतु चांदुर रेल्वे तालुक्यात ऑगष्ट पेक्षाही सप्टेंबर महिण्यातील सततच्या पात्यामुळे /अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. असे असतांना शेतक-यांना थातुर मातुर मदत दिल्या जात आहे व त्यात आता सप्टेंबर च्या नुकसान भरपाई मध्ये चांदुर रेल्वे तालुका वगळून शेतक-यांवर प्रचंड अन्याय्य करुन त्यांना नुकसान भरपाई पासुन वंचित ठेवण्यांत येणे, ही शेतक-यांची कुर थट्टा आहे. तरी हयाची वेळीच गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ चांदुर रेल्वे तालुक्याचा समावेश करुन शेतक-यांना न्याय यावा तसेच समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतक-यांची जमीन गेली आणि ज्यांच्या शेतात सिंचनाची व्यवस्था होती.

अशा सर्व शेतक-यांना हंगामी बागायतदार म्हणुन संबोधल्या गेले व त्यांना हंगामी बागायतदार म्हणुन मोबदला दिल्या गेला परंतु आता अशा शेतक-यांना कोरडवाहु शेतकरी म्हणून १८,५०० प्रति हेक्टर मदत जाहिर आहे. हंगामी बागायतदार म्हणुन दिली जाणारी रु. २७००० प्रति हेक्टर मदत ही उस उत्पादकांसाठीच असणार आहे. त्यामुळे सिंचन असणा-या शेतक-यांवर ही बाब अन्याय करणारी आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्था असणा-या अशा शेतक-यांना समानन्यायाने २७००० प्रति हेक्टर प्रमाणे मदत मिळण्यांत यावी तसेच चांदूररेल्वे तालुका विशेष पैकेज योजनेत समावेश करून सरसकट मदत घ्यावी याकरिता माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश आरकेर पूर्व सभापती प्रभाकर वाघ, तहसील अध्यक्ष अमोल होले, पूर्व नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी,खरेदी विक्री संघ अध्यक्ष गोविंद देशमुख ,पंकज शिंदे,रूपेश पुडके,अशोक चौधरी, अरुण शेळके, मुरलीधर सराड,श्रीधर धावडे, प्रशांत कोल्हे,अतुल चांडक, राव साहब शेळके, विजय राठोड, राजेन्द्र राजनेकर, सोसायटी अध्यक्ष हर्षल वाघ, देवानंद खुणे प्रफुल कोकाटे, दीपक सोळंके, सुमित सरदार, सारंग देशमुख, नरेंद्र मेश्राम अमीरभाई, श्याम पंनपालीया, सुधीर नरलगे, पवन चौधरी, सुभाष फेरासपुरे, रामाजी अवघड, संजय कोल्हे, बाळासाहेब देशमुख, अनिस भाई सौदागर,प्रतीक भैसे, सक्षम वानखडे, राजेश लाजेवार, महिला अध्यक्ष वर्षा देशमुख, कल्पना लांजेवार, स्वप्निल अविनाश पप्पू माने, रशीद भाई, मिलिंद गुजरकर सागर भोंडे, गोपाल अविनाश, सतीश देशमुख, निलेश गावंडे, गितेश सिंग ठाकूर, प्रफुल माईंदे, सुनील अग्रवाल, पंकज मेश्राम शहजाद सौदागर भीमराव पवार गजानन इंगळे, गणेश फरकाडे, प्रभाकर इखार, शुभम जगताप, तेजस चौधरी राजू शेळके कांग्रेस कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.
