
‘ बुध्दम शरणम गच्छामी ‘ ह्या शांतातमय मंत्रौपचाराने अनेकांचे लक्ष घेतले वेधूम.
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे येथील स्थानिक मिलिंद येथील लुंबिनी बौद्ध विहाराने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा दरम्यान चालणाऱ्या तीन महिन्याच्या वर्षावास मध्ये श्रावण पौर्णिमेनिमित्त नुकतेच भव्य धम्म रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या धम्म रॅलीचे आयोजन रमा मातोश्री रमाबाई महिला मंडळ तसेच पंचशील स्पोर्टिंग क्लब मिलिंद नगर सहकार्याने करण्यात आले.भिक्खू संघासह ह्या धम्म रॅली चे मिलिंद नगर येथील लुम्बिनी बौद्ध विहार ते जुना बस स्टॅन्ड येथून भ्रमण करीत स्थानिक नगरपरिषद कार्यलाय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धम्म रॅली मूलगंध कुटी विहार, राजीव गांधी नगर येथील विहारापर्यंत पोहचली तिथे भिक्खू संघाचे विहारातील उपासकांनी भव्य दिव्य असे स्वागत केले यानंतर पुन्हा रॅली मिलिनगर मधील लुंबिनी बौद्ध विहाराकडे मार्गस्त झाली. मिलिंद नगर मधील उपासक विजय वानखडे ,मधुकरराव मकेश्वर, राजू नितनवरे, ,मनोज गवई, सौरभ गायकवाड ,सुनील आठवले ,विजय आठवले, सक्षम वानखडे,रमेश तानवले,भारत भाऊ गेडाम,खडसे तसेच महिला मंडळाच्या सदस्या मंगलाबाई वानखडे, लताबाई गवई, मिनाबाई गवई इंदिराबाई गवई, रेखाबाई वानखडे, कविता नितनवरे ,बेबी वानखडे ,मीना वानखडे आशा गवई, आशा वानखडे , रूपाली वानखडे सविता फुलझेले, सुनंदाबाई गवई ,दीक्षा गवई आशा गायकवाड, श्रुतिका आठवले, मेघा वानखडे वंदना मकेश्वर समस्त महिला मंडळह्या महिलासह अनेक युवक व युवत्या सुद्धा स्वयमस्फूर्तीने सहभागी झाल्या.