
आठ आरोपींना अटक ; मोठ्या प्रमाणावर जुगार साहित्य व रोख जप्त.
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मालखेड रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात जुगार साहित्य, रोख रक्कम व मोबाईल जप्त केले आहेत. २७ जून २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की, मालखेड रेल्वे जवळील बाजार बीट परिसरात हरिश जुगार खेळवतो आहे. सदर माहितीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये
रोख रक्कम – ₹१९,६७०
मोबाईल ५ नग – ₹२०,००० (अंदाजे किंमत)
बजाज एलएस कंपनीची मोटारसायकल (एम. एच. २७ एसिपी ५६२७) – ₹५०,०००
हिरो होंडा मोटारसायकल (एम. एच. २७ एबी २२३१) – ₹३५,०००
होंडा शाईन मोटारसायकल (एम. एच. २७ सिएक्स ४२१८) – ₹६०,०००
*अटक करण्यात आलेले आरोपी* *पुढीलप्रमाणे आहेत:*
१. मुरसलीम इरशाद खान (२८)
२. शकील खान (५५)
३. मोहम्मद शिराज खान (२८)
४. शाकील शालिक खान (२८)
५. रियाज शेख (२४)
६. प्रभाकर मेश्राम (२८)
७. अशोक लक्ष्मण जुळे (६२)
८. हरिश नामेवर (४२)
या प्रकरणात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सागर श्रीराव जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज लाडखेडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत गिरी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पो.हे.कॉ. रोहित कुळके, पोशि अंबादास शिवाजी गीते, गिरेश्वर रिठे, गजानन वाघमारे, प्रवीण नेमाने, अंकुश शिरसाट, प्रशांत भोळे यांचा समावेश होता.