चांदूर रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी रोजी पंचायत समितीच्या ४ गणा करीता आरक्षण जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये आमला गण क्रमांक १०७ सर्व साधारण महिला), मालखेड गण क्रमांक १०८ सर्व साधारण महिला), घुईखेड गण क्रमांक ११० नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष किंवा महिला,तर पळसखेड गण क्रमांक १०९ अनुसूचित जाती करीता राखीव असून पुरुष किंवा महिला कोणीही उभे राहून शकतात असे आरक्षण लक्की ड्रॉ अनुसार निघाले आहे.

धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे तहसीलमध्ये २ जिल्हा परिषद सर्कल असून ज्यात आहेत जिल्हा परिषद आमला (५४) हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव तर घुईखेड ५५ अनुसूचित जाती करीता पुरूष किंवा महिलासाठी राखीव आहे तर चांदूर रेल्वे पंचायत समिती मधील ४ गणांची सोडत १३ ऑक्टोबर तहसील कार्यालयात काढण्यात आली ज्यामध्ये आमला गट क्रमांक १०७ (सर्व सर्वसाधारण महिला), मालखेड गट क्रमांक १०८ (सर्व सर्वसाधारण महिला), घुईखेड गट क्रमांक ११० (नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग मडगाव प्रवर्ग पुरुष किंवा महिला) तर पळसखेड गट क्रमांक १०९ (अनुसूचित जाती करीता राखीव असून पुरुष किंवा महिला सोडत लक्की ड्रॉ उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे आणि तहसीलदार पूजा माटोडे, नायब तहसीलदार अजय बनारसे यांच्या उपस्थितीत तसेच विविध राजकीय पक्षांच्या सदस्य, पत्रकार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
