अनेक मातब्बर नेत्यांच्या सौभाग्यवंत्या रिंगणात उतरण्याच्या शर्यतीत
चांदूर बाजार /एजाज खान
राजकारणाची प्राथमिक शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर येत्या जानेवारी महिन्यापर्यंत होणार असून जिल्हा परिषदचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर १३ ऑक्टोंबर रोजी जाहीर झालेल्या चांदूरबाजार तालुक्यातील बारा गणाकरिता पंचायत समिती मतदार संघ निहाय सदस्य पदांच्या आरक्षण सोडत तहसील कार्यालय चांदूरबाजार येथे १३ ऑक्टोबरला सकाळी ११वाजता उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार सोनल सूर्यवंशी , व नायब तहसीलदार मनीष यांबलवार यांच्या उपस्थितीत १२ गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आले.तालुक्यातील कारंजा बहिरम गण सर्वसाधारण , करजगावं गण सर्वसाधारण , शिरसगाव कसबा गण ना मा प्र महिला , देऊरवाडा गण सर्वसाधारण महिला , ब्राह्मणवाडा थडी गण ना मा प्र , घाटलाडकी गण अनुसूचित जमाती , कुऱ्हा गण ना मा प्र महिला , थुगावं पिपंरी गण अनुसूचित जाती महिला , शिरजगाव बंड गण सर्वसाधारण , करजगाव गण सर्वसाधारण , बेलोरा गण सर्वसाधारण महिला , आसेगाव गण अनुसूचित जाती , तळवेल गण सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आले.तालुक्यातील १२गणाचे आरक्षण काढताना धैर्य सुधीर हिवराळे या पाच वर्षीय चिमुकल्याचा हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जाहीर झालेल्या पंचायत समितीच्या बारा गणाच्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे देऊळ पाण्यात गेले असल्याने आरक्षणा काढता वेळी कही खुशी कही गम चे वातावरण दिसून आले. यावेळी उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार सोनल सूर्यवंशी,नायब तहसीलदार मनीष यांबलवार यांच्या उपस्थितीत निवडणूक सोडत काढण्यात आली आहे.
