
महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॲपद्वारे हजेरी बंधनकारक
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेसॲपद्वारे हजेरी लावावी लागणार आहे. यामध्ये तलाठी पासून उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना फेसॲपद्वारे हजेरीचे बंधन करण्यात आले आहे. फेसअॅपवर हजेरी दाखवली नाही तर संबंधीत अधिकारी हा गैरहजर समजला जाणार आहे.
विशेष म्हणजे ज्या गावात नोकरी आहे, तिथूनच उपस्थिती लावावी लागणार आहे.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत पारदर्शकता आणण्यासाठी एक मोठा निर्णय ज्या गावात नोकरी, तिथूनच उपस्थिती लावावी लागणार घेतला आहे. आता तलाठी पासून ते उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्व महसूल अधिकाऱ्यांना दररोज फेसॲपद्वारे हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.या नव्या आदेशानुसार, फेसअॅपवर हजेरी नोंदवलेली नसेल तर संबंधित अधिकारी ‘गैरहजर’ समजले जाणार आहेत. हजेरीची ही नवी पद्धत ऑगस्ट २०२५ पासून संपूर्ण राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे.यासोबतच एक महत्त्वाची अट अशी आहे की, संबंधित अधिकाऱ्याने आपली उपस्थिती फक्त ज्या गावात त्यांची नेमणूक आहे, त्या गावातूनच लावावी लागणार आहे. यामुळे “फील्डवर न जाता कार्यालयीन उपस्थिती” दाखवण्याच्या प्रथेला आळा बसेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.