
अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अपंग निराधारांसाठी शासनाने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहेत. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजने व सवलती पासून अपंग निराधार वंचितराहत आहेत.
तरी खालील मागण्यासांठी आपले दालनात अपंग निराधारांचे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.१) अपंग निराघरांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरीत वितरीत करण्यात यावे.२) दरमहा निराधार योजनेचे मानधन बैंक खात्यात जमा करण्यात यावे.३) अपंग निराधारांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावे.४) निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरीत निकाली काढण्यात यावेत.५) अपंग निराधारांना घरकुल योजनेचा खरीत लाभ देण्यात यावा.6) तालुक्यातील ग्राम पंचायत प्रशासनाने दिव्यांग 5% निधी त्वरित खर्च करावा.या प्रमुख मागाण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे नांदगाव (खंडे)तालुका अध्यक्ष विजय टेळे यांनी आयोजन केले होते. व निवेदन देते वेळी विजय टेळे, प्रमोद शेबे, सुधीर कोहरे, ज्योती देवकर, कांचन कुकडे, धनश्री पटोकार, अक्षय बनारसे, मुतलीब चाऊस, जय कुमार रुपने,आर. एम. पवार व राहुल वानखडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.