
राख्या खरेदीसाठी ऑनलाइनचे आकर्षण
राखीच्या दरात २० ते २५ टक्के वाढ, बाजारपेठा सजल्या
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
श्रावण महिना लागताच सणांची रेल-चेल सुरू होते. बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन.मात्र यंदा भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी यंदा २० ते २५ टक्क्यांनी महागली.रक्षाबंधननिमित्त बाज-ारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.भाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली आहे तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवावर्ग दिसत आहे.अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त विविध बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत.बहिणींसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणावर यंदा महागाईचे सावट दिसून येत आहे.सर्वच क्षेत्रांत वाढलेल्या महागाईचा परिणाम आता राख्यांच्या किमतीवरही दिसून येत असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. रक्षाबंधनाचा सण ९ ऑगस्ट रोजी आहे.भावांना राखी पोस्टाने पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.बाजारात सर्वच प्रकारच्या राख्या महाग असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी देवराख्या पाच रुपये डझनप्रमाणे सहज उपलब्ध होत असत.आता या राख्यांची किंमत सात ते आठ रुपये झाली आहे.बाजारात ५ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. यात ५० ते १०० रुपयांच्या राख्यांची अधिक विक्री होत आहे.
राख्या खरेदीसाठी ऑनलाइनचे आकर्षण
बाजारात आकर्षक ऑनलाइन राख्या उपलब्ध आहेत. त्याचवेळी बदलत्या ट्रेंड नुसार राख्या खरेदीसाठी विविध ऑनलाइन साइटवरही राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये चांदीच्या राख्यांसोबतच ॲक्रेलिक व लाकूड या प्रकारातील राख्यांनाही मोठी मागणी आहे. ऑनलाइन राख्या खरेदी करताना भरघोस सूट मिळत असल्यामुळे काही बहिणींची या राख्यांना पसंती असल्याचे दिसून येते.
लहान राख्यांना ग्राहकांची अधिक पसंती
बाजारात लहान राख्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.राखीसाठी लागणारे रेशीम, कुंदन तसेच मजुरीत वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या भावात १० टक्क्यांची वाढ झाली असे राखी विक्रेत्यांनी सांगितले.
कुंदन वर्क,साध्या राख्यांना मागणी
चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम,डोरेमॉन,मोटू पतलू,श्री गणेशा,श्रीकृष्ण अशा राख्या वाज-ारात विक्रीस आल्या आहेत. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे.लायटिंग, लाकडी,पपेट,कडा राखीसह पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.