
स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणची यशस्वी कारवाई
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणच्या पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक करून घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणेबसून त्यामध्ये
अक्षय गंगाराम बगाडे (वय २० वर्षे)
बाबा गणेश गोरखडे (वय १७ वर्षे, दोघेही रा. तिलसुरी, नागपूर) यांचा समावेश आहे
दिनांक ३०/०६/२०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील तिलसुरी गावात सापळा रचून वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमरावती व विदर्भातील विविध भागांत घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून खालील चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात. त्यामध्ये
MH 49 BF 9296 – पो.स्टे. लक्ष्मीनगर, नागपूर
MH 19 BY 4615 – पो.स्टे. रिटर्नी खदान, नागपूर
MH 31 EH 3458 – पो.स्टे. रिटर्नी खदान, नागपूर
त्याचप्रमाणे चोरी केलेल्या ३ मोटार सायकल (एकूण किंमत रु. २,६०,०००) आणि रोख रक्कम रु. १२,६१० असा एकूण मुद्देमाल रु. २,७२,६१० चा जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत
कलम ३०४(अ), ३३९ भा.दं.वि. – अपघाती मृत्यू व इजा (पो.स्टे. तिलसुरी व पो.स्टे. मनकापुर, नागपूर)
कलम ३७९ – चोरीचे गुन्हे (पो.स्टे. लक्ष्मीनगर, रिटर्नी खदान इ.)
या यशस्वी कारवाईत पो.नि. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज माने, पोह.ना. वाडे, राठोड, शांतीलाल सोमाने, चालक नितीन आवाडे यांचेसह पोलीस निरीक्षक, अमरावती ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण आदींचा सहभाग होता.