कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शरीर, मन स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांनी खेळाडू वृत्ती ठेवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे कुलगुरूंनी फित कापून उद्घाटन केले,

त्याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजयपाल उपाध्याय यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. अजयपाल उपाध्याय मार्गदर्शन करतांना म्हणाले, खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून, आरोग्य हेच खरे धन आहे. पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत म्हणाल्या, संघभावना, सहकार्य, शिस्त, प्रामाणिकपणा या गुणांचा विकास खेळांतूनच होतो. खेळाचे जीवनात अपार महत्व असून प्रत्येकाने अभ्यासासोबतच खेळालाही तितकाच वेळ द्यावा.

विद्याथ्र्यांसाठी व्हॉलिबॉल व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एम.बी.ए., शारीरिक शिक्षण, वसतीगृह, भौतिकशास्त्र, गृह विज्ञान, संगणकशास्त्र, विभागाच्या विद्यार्थी संघाने भाग घेतला. ‘एक घंटा खेल के मैदान मै’ असा नारा देऊन विद्याथ्र्यांना क्रीडा दिवसानिमित्त शपथ देण्यात आली. याप्रसंगी विभागाचा माजी खेळाडू डॉ. अभिजीत इंगोले यांना श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ.विजय निमकर, डॉ.निलेश इंगोले, डॉ.सौरभ त्रिपाठी, कु. सविता बावनथडे, विविध विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कु. निकिता भट हिने आभार मानले. पल्लवी शिंदे, शीतलदेवी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
