अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
श्री संत वासुदेव जी महाराज वारकरी शिक्षण सेवा चरिटेबल ट्रस्ट, रामा, अमरावती द्वारा संचालित, *ज्ञानसागर आध्यात्मिक गुरुकुल* अयोध्या नगरी, चांगापुर, अमरावती येथे भव्य दिव्य स्वरूपाचा जिल्हास्तरीय दोन दिवशी 300 सेवेकरांच्या समवेत 5001 भाविकांचा श्री विजय ग्रंथाचा महापरायान सोहळा येत्या फाल्गुन शुक्ल चतुर्थी शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी ते फाल्गुन शुक्ल पंचमी रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे या पाराण्याचे व्यासपीठ नेतृत्व ह भ प श्री प्रकाशजी महाराज चैतन्य, आळंदीकर हे करणार आहे. तरी या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पारायणा सोबतच वारकरी हरिपाठाचा आनंद व एकनाथी बहुरंगी भारुडाचा कार्यक्रम सुद्धा होनार भारुड सादर करते ह भ प श्री संतोष महाराज भालेराव त्याचबरोबर हरिभक्त परायण गुरुवर्य अविनाशजी महाराज रोडे अमरावती यांचे काल्याचे किर्तन व दहा हजार भाविकांचा महाप्रसाद सुद्धा होणार आहे तरी या अवस्मरणीय कार्यक्रमाचे आपण साक्षी होऊयात व श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद संपादन करुया. कार्यक्रमाची दैनंदिनी दिनांक 21 फेब्रुवारी, सकाळी 7 वाजता. श्री राम मंदिर इथून ग्रंथ दिंडी सोहळा, 8 वाजता. ग्रंथ पूजन व पारायणास सुरुवात, सायंकाळी, 5 वाजता. वारकरी हरिपाठ, रात्री, 7 ते 9 एकनाथी बहुरंगी भारुडाचा कार्यक्रम, रविवार, दिनांक. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी, 7 वाजता श्रींच्या चरणपादुकांचा अभिषेक, सकाळी,8 वाजता. ग्रंथ पूजा व पाराण्यास सुरुवात, सकाळी,10 वाजता. काल्याचे किर्तन,दुपारी, 12 वाजता. संत दर्शन सोहळाव नंतर दुपारी 1 वाजता. महाप्रसाद ही माहिती संस्थेचे संस्थाध्यक्ष ह भ प श्री श्री आदित्य महाराज रोडे यांनी दिली आहे.
