सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांचे आवाहन
माहूर / संजय घोगरे
श्रीक्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी दि. 29 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत नवरात्र काळात लाखो भाविक येणार असल्याने त्यांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही यासाठी सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी दोंतूला यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना केले. तसेच भाविकांच्या सुरक्षेची दक्षता, महाप्रसादाचे नियोजन, एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था, मरविमकडून अखंडित वीजपुरवठा यासह सर्व आवश्यक सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत तहसीलदार अभिजीत जगताप, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नायब तहसीलदार कैलास जेठे, श्रीमती अरुणा सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी. के. भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. माचेवार, मरविमचे अभियंता आर. बी. शेंडे, एसटी महामंडळाचे सी. आर. समर्थवाड, माहूर न.प. चे संदीप गजलवाड, गिरीश डुबेवाड, विस्तार अधिकारी रमेश गावंडे, डॉ. अभिजीत आंबेकर, महसूल विभागाचे अधिकारी, श्री रेणुकादेवी संस्थानचे माजी विश्वस्त संजय कान्नव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.सहाय्यक जिल्हाधिकारी दोंतूला यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना देऊन नवरात्र महोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
