मोर्शी / संजय गारपवार
मराठा समाजाला लागू करण्यात आलेला हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ‘ब’ प्रवर्गाचे आरक्षण मिळण्याकरिता मोर्शी तालुका बंजारा आरक्षण कृती समितीचा तहसील कार्यालयावर महामोर्चा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी दुपारी एक वाजता चांदूर बाजार मार्गावरील पेट्रोल पंपा पासून मोर्शी तालुका बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे. हैदराबाद गॅझेट व सी पी अँड बेरार च्या करारानुसार राज्यातील सर्व बंजारा समाज बांधवांना एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाज महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून डफडे वाजवत महामोर्चा काढण्यात आला होता. महामोर्चात सहभागी समाज बांधवांनी यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एकच लाल सेवालाल, बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या होत्या. तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही एस टी प्रवर्ग आरक्षणाची मागणी केली आहे.महामोर्चा चे रूपांतर तहसील कार्यालया जाहीर सभेत झाले असता बंजारा समाज कृती समितीचे अध्यक्ष देवराव चव्हाण, पूजा राठोड, श्रीकृष्ण पवार इत्यादीने समाज बांधवांनी महामोर्चात सहभागी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी प्रदीप कुमार पवार यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील बंजारा समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी झाले होते. या महामोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालया पर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
