
बडनेरा येथे निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर संपन्न.
बडनेरा / प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती ,जिल्हा ॲमेच्यूर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती,नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा ( शारीरिक शिक्षण विभाग) राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा , द फायटर स्पोर्ट क्लब अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, सुट्ट्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.निरोगी जीवन शैली ,तणाव मुक्त सुदृढ आरोग्य व उत्तम शरीरयष्टी यासाठी आज खेळाला महत्त्व आले असून क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक अधीक्षमताचा विकास साधण्या साठी प्रयत्न करण्यात येत आहे.
उन्हाळ्या च्या सुट्ट्यां मध्ये अवास्तव बाबींना महत्त्व न देता क्रीडा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सदर शिबिर हे घेण्यात आले होते असे मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी सर यांनी सांगितले सेन्सई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शना मध्ये नियमित शारीरिक तंदुरुस्ती साठी व्यायाम, कराटे, योगा ,मार्शल आर्ट ,शिवकालीन मर्दानी खेळ, रोप स्किपिंग, स्वसंरक्षण, बुद्धिबळ, मैदानी खेळ व व्यक्तिमत्व विकास बद्दल प्रशिक्षण देण्यात आले . सदर प्रशिक्षण शिबिराचा समारोपिय कार्यक्रम नुकताच सार्वजनिक कपिल बुद्ध विहार च्या सभागृहा मध्ये संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमां मध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भाऊ बनसोड , प्रमुख अतिथी प्रा.अमोल मिलखे सर, गजानन सावंत, सुभाष बेलेकर , विपिन मसी सर ,सौ स्नेहल प्रवीण पुंडकर तसेच इयत्ता दहावी मध्ये बडनेरा मधून प्रथम स्थान प्राप्त करणारी सत्कारमूर्ती कु. रसिका राजेंद्र धुर्वे व्यासपीठावर उपस्थित होते.शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमां मध्ये विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित गण मान्य अतिथींचे ,पालकांचे मने जिंकून घेतले कारण त्यांनी प्रशिक्षण शिबिरा मध्ये जे प्रशिक्षण प्राप्त केले त्याचे खूप छान सुंदर असे चित्तथरारक असे प्रात्यक्षिक सादर केले.दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही साई स्पोर्ट अँड म्युझिक अमरावती चे संचालक श्री राजेश लवणकर यांच्या तर्फे शिबिरार्थ्यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या व शिबिरार्थ्यांना, प्रशिक्षण देणाऱ्या सहाय्यक प्रशिक्षक व उत्कृष्ट शिबिरार्थी तसेच सत्कारमूर्ती यांना त्यांच्या तर्फे सन्मान चिन्ह देण्यात आले.सदर शिबिरा करता जिल्हा क्रीडा अधिकारी श्री गणेश जाधव सर, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने सर, श्री राजेश वडते सर , वैशाली इंगळे मॅम, त्रिवेणी बांते मॅम, प्रफुल डांगे सर, निलेश जाधव सर, शुभम मोहतुरे, गणेश तांबे , राजपाल भाऊ ,शेख अखिल सर, प्रणिती भिमटे ताई, तसेच बडनेरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, गणमान्य अतिथी यांनी अभिनंदन केले.