
बडनेरा येथे सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग दिन साजरा.
बडनेरा / शहर प्रतिनिधी
योग हा एक प्राचीन भारतीय शारीरिक ,मानसिक आणि अध्यात्मिक साधना प्रणाली आहे .जो शरीर आणि मन यांच्यातील संतुलन साधण्या साठी विविध आसणे, प्राणायाम आणि ध्यान याचा समावेश करतो. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून तो एक संपूर्ण जीवनशैली आहे. योगाच्या अभ्यासामुळे शरीर मन आणि आत्मा यांचे समग्र आरोग्य साध्य होते. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन जागतिक स्तरावर साजरा होतो . प्राचीन भारतीय संस्कृतीची अवघ्या जगाला दिलेली ही एक अमूल्य देन म्हणजे योग ,माणसाला अंतर्बाह्य निरोगी करून दीर्घ आयुष्य प्रदान करण्याचे सामर्थ्य योगात आहे.आज संपूर्ण जगाने योग अभ्यासाचा केलेला स्वीकार हे त्याचेच प्रतीक आहे. याच उद्देशाने जिल्हा ॲमेच्यूर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती चे सचिव सेन्साई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शनात नुकताच बडनेरा येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सोनल रंगारी सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच विविध आसनांचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून करून घेऊन त्यांना त्याचे फायदे व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.जीवन तनामुक्त भयमुक्त आणि निरोगी रहावे या हेतूने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. सोनल रंगारी सर यांच्या सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण वर्गामध्ये नियमित असे विविध उपक्रम राबविले जातात.या कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. खुशाल आलसपुरे संघटनेचे पदाधिकारी राम पांडे ,संग्रक्षक बडगे, राहुल रंगारी, शुभम मोहितुरे, अमर नंदेश्वर ,राजेश वानखेडे ,शुभम इंगळे, मनोज ठाकरे हितेंद्र मेश्राम यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या या कार्यासाठी बडनेरा शहरातील सर्वत्र गणमान्य अतिथी त्यांच्या या विविध उपक्रमाचे कौतुक केले.