
एकाचा घटनास्थळी मृत्यू,5 गंभीर जखमी,
मोर्शी / तालुका प्रतिनिधी
मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावर असलेल्या आष्टगाव ते वरला दरम्यान मोर्शी वरून विजेचे सिमेंट खांब घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एका मजुराच्या घटनास्थळी मृत्यू झाला मृतकाचे नाव अनिकेत सुनिल मुंदाफळे वय 26 वर्ष राह. अष्टगाव ता. मोर्शी तर जखमी चे नावे खालील प्रमाणे आहे सचिन धनु लोखंडे वय 29वर्ष, रोशन शामराव धारवाडे वय 27 वर्ष, रोशन लंगडाजी कासदेकर वय 22 वर्ष, दीपक गणेश भोकरे वय 22 वर्ष राहणार सर्व बेलमंडळी तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती तसेच अनिल महेश जानवंशी राहणार अष्टगाव या जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. जखमींवर प्राथमिक औषधोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आष्टगाव येथील अनिकेत मंदाफळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. अपघाताची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.