अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बबलु शेखावत यांच्या मान्यतेने श्री.फैय्याजउद्दीन कय्यामउद्दीन खान यांची अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत आणि ध्येय-धोरणांवर दृढ विश्वास असलेले फैय्याजउद्दीन कय्यामउद्दीन खान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय नेत्या मा. सोनियाजी गांधी आणि राष्ट्रीय नेते श्री. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील, असा विश्वास माजी महापौर श्री. विलास इंगोले यांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही त्यांचे सहकार्य मिळेल,याची खात्री आहे.या नियुक्तीप्रसंगी हाजी नजीर खान बी.के., राजीव भेले, प्रा. अजय गुल्हाने, दीपक अग्रवाल, संजय शिरभाते, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, रशीद पठाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
