जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीची मागणी
नांदगांव खंडेश्वर येथे तिव्र निदर्शने
नांदगांव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाने संमत केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी , लोकशाही विरोधी असून जनतेच्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली करणारे असल्यामुळे हे विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने केला आहे .भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) ,शिवसेना ( उभाठा ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राज्यातील इतर डाव्या पुरोगामी संघटनांचा समावेश असलेल्या जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती .नांदगाव खंडेश्वर येथे बस स्टँड चौकात समितीच्या कार्यकर्त्यांनी या विधेयका विरोधात तीव्र निदर्शने केलीत .राज्य सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे याबाबतचे निवेदन मा . तहसीलदार , नांदगाव खंडेश्वर यांचे मार्फत मा .राज्यपाल आणि मा .मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले .या विधेयकाला राज्यातील विविध नागरिक संघटना व विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे .दि . १० व ११ जुलै रोजी विधिमंडळात मंजूर झालेल्या या विधेयकाची सखोल समीक्षा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती .

या समितीकडे राज्यभरातून १२७५० हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी बहुतांश सूचना हरकती या विधेयकाला विरोध करणाऱ्या होत्या .या ९५०० सुचना हरकतीचा काहीही विचार न करता राज्य सरकारने हे विधेयक मंजूर केले आहे .या विधेयकातील अनेक तरतुदी नागरिकांच्या घटनात्मक अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या आहेत .अर्बन नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी हे विधेयक आणल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी अर्बन नक्षलवादाची कोणती स्पष्ट व्याख्या या विधेयकात नाही .बेकायदेशीर कृती कोणती याबाबत सुद्धा राज्य सरकारने या विधायकात स्पष्टीकरण दिले नाही .सरकारविरुद्ध होणारी जनआंदोलने दडपून टाकण्यासाठी हे विधेयक आणल्याचे स्पष्ट होत आहे .या विधेयकाद्वारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील राज्य सरकार जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य , संघटना स्थापन करण्याचा अधिकार , सरकारच्या जनविरोधी धोरणाला विरोध करण्याचा अधिकार इत्यादी घटनात्मक हक्कावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करीत आहे . लोकशाही व्यवस्थेत सरकारवर टीका करणे , शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे आणि न्याय मिळवण्यासाठी अन्यायाविरुद्ध संघटित होणे हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे परंतु या विधेयकातील अन्याय तरतुदीमुळे राज्यातील निरपराध नागरिकांवर कारवाई होण्याची भीती निर्माण झाली आहे .दहशतवादी , नक्षलवादी तत्त्वांना आळा घालण्यासाठी राज्यात आज रोजी अनेक कायदे अस्तित्वात आहे . Unlowful activities prevention act ( UAPA ) Maharashtra control of organise climate (MCOCA ) व भारतीय न्याय संहिता सारखे कायदे अस्तित्वात असताना आणखी एका विशेष कायद्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे मत राज्यातील विरोधी पक्षांनी व्यक्त केले आहे .भाजपच्या नेतृत्वातीलकेंद्र व राज्य सरकार देशातील प्रचंड मोठी नैसर्गिक साधन संपत्ती व जल , जंगल ,जमीन अदानी व इतर भांडवलदारांना विकत आहे .बस्तर मधील आदिवासींची जमीन ,गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील खाण प्रकल्प ,शक्तिपीठ महामार्ग , धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यासारख्या जनविरोधी भांडवलदार धार्जिण्या प्रकल्प धोरणांना जनतेचा प्रचंड विरोध होत आहे .शेतीचे कंपनीकरण करणारे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांनी आंदोलन करून हाणून पाडले आहे . सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात जनतेने आंदोलन करू नये म्हणूनच हा कायदा आणण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे .कामगार ,कष्टकरी ,शेतकरी , विद्यार्थी , युवक या सर्व समाज घटकांचे जनआंदोलने दडपून टाकण्यासाठी भविष्यात या कायद्याचा वापर होणार आहे .जनतेला संघटना करण्याचा , अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार नाकारणारा हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे समितीच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी यावेळी सरकार विरोधात आंदोलकांनी प्रचंड घोषणा देऊन या विधेयकाचा जोरदार विरोध केला .आंदोलनात माजी आमदार व राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष प्रा . वीरेंद्र जगताप , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौंसिल सदस्य कॉ . तुकाराम भस्मे , भाकपचे जिल्हा सचिव कॉ .सुनिल मेटकर , कॉ .संतोष सुरजुसे , कॉ . विनोद तरेकर , काँग्रेसचे निशिकांत जाधव, अक्षय पारस्कर , अमोल धवसे , माकपचे श्याम शिंदे , अनिल मारोटकर , राष्ट्रवादीचे सचिन रिठे , अमोल शिरभाते , शिवसेना चे ओंकार ठाकरे , प्रकाश मारोटकर , प्रमोद कोहळे , सुशिल थोरात , ओमप्रकाश सावळे , सचिन करडे , प्रकुल देशमुख संजय मंडवधरे , चित्राताई वंजारी , जयाताई मंडवधरे , मिना वैदय , रचना धवणे ,योगेश अवझाडे , अनिल मासुतकर , माधव ढोके , मनोज वानखडे , नारायण गाडेकर ,रामरावजी मासुतकर ,इस्राईल शहा ,विजय मंडवधरे ,हरिदास राजगिरे , हनुमान शिंदे , संतोष कुकडे ज्ञानेश्वर सुरजुसे ,वासुदेव चौधरी , रमेश ठाकरे ,बाळासाहेब राणे , दिक्षिताताई तरेकर , अरुणभाई शिंदे, आजाद शिंदे,भागवत भालेकर , , प्रशांत काळे ‘ मोहन चोर , राहुल भाकरे ,मनोज गावंडे, नॅमदभाई , समशेरखाँ पठाण , दिपक भगत , देवेंद्र कंठाळे , किशोर शिंदे ,दिलीप महल्ले , मोहसिन शेख , दिपक सवाई , संजय कुंभळकर , विजय चिंचे , मनिष सावदे , रणजित मेश्राम , भैय्याजी रोहणेकर , समीर दहातोंडे ,किरण देशमुख ,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते .
