टॉल्क बड्डी अलेक्सा करणार विद्यार्थ्यांशी संवाद
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नाविन्याची उत्तम उदाहरण ठरवत जिल्हा परिषद शाळा दाभा येथे कार्यरत अंकुश गावंडे यांनी आपल्या शाळेत पूर्णपणे स्वतःच्या खर्चातून एक अत्याधुनिक ‘ICT कॉर्नर’ स्थापन केला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या डिजिटल आणि AI आधारित शिक्षणास आणि सर्जनशील शिकण्याच्या अनुभवाला चालना देतो, आणि शिक्षण क्षेत्रात नवीन आदर्श निर्माण करतो.या ICT कॉर्नर मध्ये विद्यार्थ्यांना ‘इंटरएक्टिव्ह साधने, डिजिटल शिक्षण उपकरणे आणि स्मार्ट शिक्षण साधने’ उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याचा अनोखा अनुभव घेऊ शकतात. त्या माध्यमातून ‘Talk Buddy अलेक्सा – टॉल्किंग विथ अलेक्सा’, ड्रीम स्पेस स्टुडिओ, AR मॅजिक कॉर्नर,टिंकर झोन, इन्स्पायर टॉल्क स्टुडिओ, क्रोमा स्टुडिओ, AI स्मार्ट हब असे नावीन्यपूर्ण असे उपक्रम या ICT कॉर्नर मधून ते राबवितात.जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी शाळेला भेट देऊन या ICT कॉर्नर आणि Alexa आधारित शिक्षण उपक्रम पाहिले व त्यांना सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 9 सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात अमरावती विभाग च्या आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते अनावरण करून जिल्ह्यातील काही शाळांना अलेक्सा व VR देऊन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात अंकुश गावंडे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी टॉल्किंग विथ अलेक्सा उपक्रम चे सादरीकरण केले त्यांचे व विदयार्थ्यांचे आयुक्तांनी कौतुक केले. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशील, संवादक्षम आणि तंत्रज्ञानाभिमुख शिक्षणाला चालना देतील असे आहेत.अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी देखील शाळेल भेट दिली तेव्हा या ICT कॉर्नर उपक्रमाचे कौतुक केले.याच बरोबर अंकुश गावंडे यांच्या या उपक्रमाची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी प्रशंसा केली असून, गावंडे यांच्या सादरीकरण दरम्यान असा ICT कॉर्नर व विशेष करून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संवाद कौशल्य विकसित करण्यात अत्यंत प्रभावी असा उपक्रम टॉल्किंग विथ अलेक्सा राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले आहे आणि तसे आश्वासन त्यांनी गावंडे यांना दिले होते.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई द्वारा गावंडे यांना संपर्क करून विस्तृत असा प्रस्ताव सुद्धा मागवून घेतला आहे.अंकुश गावंडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे फक्त त्यांच्या शाळेतीलच नाही, तर महाराष्ट्रातील शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला जात आहे. हा उपक्रम दाखवतो की, नवीन संकल्पना, मेहनत आणि वैयक्तिक गुंतवणूक शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतात.अंकुश गावंडे हे उपक्रम शील व तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केलेत जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धन साठी त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरु केला आहे.
या प्रकल्पांत ५० पेक्षा जास्त देशांतील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांनी शाळांमध्ये पर्यावरण-जागृती आणि टिकाऊ शिक्षणाच्या दिशेने मोठा बदल घडवून आणला आहे.या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण असे उपक्रम वृक्षारोपण व संवर्धन करिता अनेक मोहीम, प्लास्टिक मुक्त शाळा साठी उपक्रम, जागतिक स्तरावर शिक्षण व सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रम, शिक्षक,विद्यार्थी करिता विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा, वेबिनार, सेमिनार असे अनेक कार्यक्रम व उपक्रम 2020 पासून राबवित आहेत. या प्रकल्पच्या माध्यमातून त्यांनी 2020 ते 2025 पर्यंत मोठया प्रमाणात जागतिक स्तरावर वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविली आहे. नुकताच त्यांनी वृक्ष संवर्धन करिता “मला तोडू नका-मी जिवंत आहे” हा उपक्रम सुरु केला आहे.गावंडे यांनी पाठ्यपुस्तकातील चित्राना AR युक्त बनविण्याचा प्रयोग केला आहे. तसेच अनेक शैक्षणिक ऍप्प ची सुद्धा निर्मिती केली आहे. विशेष करून इंग्रजी विषयांचे वाचन व संवाद सोपा व्हावा या करिता अनेक उपक्रम रबविले ज्याचा फायदा फक्त त्यांच्याच शाळेतील नाही तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ऍप्प, वेबसाईट व युट्युब चॅनल च्या माध्यमातून होत आहे.
अंकुश गावंडे यांच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ची व कार्याची दखल घेऊन विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार तसेचमहाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. नुकतेच त्यांना शासनाच्या वतीने सिगापूर येथे अभ्यास दौरा करिता पाठविण्यात आले होते तेथील प्रशिक्षण व शाळा भेटी च्या अनुभवातून सुद्धा अनेक उपक्रम त्यांनी सुरु केले आहेत. अंकुश गावंडे यांना जागतिक स्तरावर तंत्रज्ञान व AR वर कार्य करणाऱ्या UK, USA आणि न्युझिलंड देशातील संस्थांनी Ambassador म्हणून सन्मानित केले आहे. जागतिक स्तरावर त्यांची ग्लोबल टिचर म्हणून ओळख व ख्याती निर्माण झाली आहे.
