स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्यावतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत दिनांक १९/९/२०२५ ते २/१०/२०२५ या कालावधीमध्ये ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे रक्तदाब ,मधुमेह, नेत्र, दंतरोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख , मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन , क्षय रोग, कुष्ठरोग, सिकलसेल आजार रक्तक्षय तपासणी , विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन स्थानिक व क्षत्रिय आहाराला प्रोत्साहन देणे, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार मासिक पाळी स्वच्छता व पोषण , माता बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृवंदन योजना नोंदणी, आयुष्यमान कार्ड योजना त्याचप्रमाणे दिनांक २६/ ९/२०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. शासनातर्फे सुरू असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांसाठी सुरू असलेल्या आरोग्य तपासणीचा मोठ्या संख्येनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.मेघा गिऱ्हेपुंजे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अंजनगाव, तसेच वैद्यकीय अधिकारी अनुक्रमे डॉ. वेदांत टांक, डॉ. मृणाल मोहोड, डॉ. अक्षय रेखाते, डॉ. वैष्णवी काकड, डॉ. साकिब शेख, डॉ. तरुण पटेल, डॉ. सुवर्णा बिहाडे, डॉ. शाहिद, डॉ. जुनेद, डॉक्टर बढीये, डॉ.धाकडे यांनी केले आहे.
