
अवैध जुगार अड्ड्यावर धाड, १५ जुगारी अटकेत
अंजनगाव सुर्जी / तालुका प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनच्या पथकाने शिरजगाव रस्त्यालगत प्रेम रॉय यांच्या शेतात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकूण १५ जणांना रंगेहाथ पकडले. आरोपी “एक्का-बादशहा” या ५२ गंजोपाच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले.गोपनीय माहितीनंतर पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग दरम्यान घटनास्थळी पोहोचले. पंचांसह केलेल्या कारवाईत जुगारासाठी वापरले जाणारे ५२ गंजोपा पत्ते, रोख रक्कम रु. २१,१००/- व अंदाजे रु. ३,१०,०००/- किमतीच्या पाच मोटारसायकली असा एकूण रु. ३,३६,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असून त्यामध्ये प्रविण भरत तायडे, 43, हेतोडा, संतोष चंपतराव इंगळे, 42, भिम नगर, शिवा उर्फ आकाश सहदेवराव राउत, 23, मातंगपुरा, रविंद्र काशीनाथ इंगळे, 35, तहसिल रोड, रोहोल अनिल सपकाळ, 21, सलीम नगर,रूधिकेश राजेंद्र नांदुरकर, 24, शहापुरा, प्रदीप किसनराव विजयकर, 24, शहापुरा,राजु प्रल्हाद कोटेकर, 30, डोरपुरा, शेख जाकीर शेख इब्राहीम, 38, संघई शाळेजवळ, मनोज अशोक गोर, 27, भोईपूरा, दिपक जगदीश कनोजीया, 30, संघई शाळेजवळ, शरिफ खा शफी खा, 47, भालदारपुरा, विवेक उर्फ विक्को श्रीकृष्ण मोरे, 24, भोईपूरा, प्रमोद सेवकराम इंगळे, 32, शहापुरा, राहुल प्रकाश इंगळे, 26, पानआटाई,ही कारवाई मा. श्री. विशाल आनंद (भा.पो.से), पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, मा. श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुरज तेलगोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस कर्मचारी रवि राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे, शुभम मारकंड, प्रमोद चव्हाण, युवराज सोळंके, मोहसीन पठाण आणि चालक अक्षय शेळके, विलास रावते,यांनी कारवाईत सहभाग घेतला.पोलीस अधिक तपास करीत आहेत.