दर्शनाकरीता भाविकांची रीघ
चांदूर रेल्वे/तालुका प्रतिनिधी
परिसरात प्रसिद्ध असलेल्या बोंडाई मातेच्या नवरात्रोत्सवाला पुरातन परंपरा आहे. गावालगत असलेल्या शेतात बोंडाई मातेचे स्थान असून येथे मोठ्या उत्साहात देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला गावातील स्व नारायनसिंह जाधव यांच्या शेतात बोंडाई मातेचे पुरातन स्थान आहे. स्व नारायण सिंह जाधव यांचे गावाला लागुन शेत आहे. या शेतात बोंडाई मातेचे पुरातन मंदिर आहे. या शेतात पुरातन काळात बोंडाई माता प्रकट झाली असे गावातील ज्येष्ठ जाणकार व्यक्तींनी सांगितले. तेव्हापासून या ठिकाणाला बोंडाई मातेचे स्थान म्हणून संबोधल्या जाते. पुरातन काळापासून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जात असे परंतु मध्यंतरी काही वर्ष यात खंड पडला त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मानसिंह जाधव यांना बोंडाई मातेचा दृष्टांत झाला. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. या ठिकाणी देवीच्या भव्य मंदिराचे नवनिर्माण मानसिंह जाधव यांनी केले आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा घटस्थापना करून नवरात्रोत्सव प्रारंभ झाला आहे. याठिकाणी आजूबाजूच्या गावातील भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली असते. नवरात्रोत्सव यशस्वी करण्याकरिता देवीचे भक्त मानसिंह जाधव,विजयसिंह सिसोदिया, रायसिंह जाधव,रजेसिंह जाधव,योगेश जाधव,कुलदीप जाधव,रत्नदीप जाधव,तेजस जाधव,ऋषिकेश जाधव,मोहन गिरासे,अमित जाधव,हर्षल जाधव,रोशन जाधव,अविनाश जाधव,सागर जाधव,धीरज जाधव, अमन जाधव,नरेंद्र जाधव,जयदीप जाधव,रवींद्र नेवारे, चेतन जाधव,महेश चव्हाण हे परिश्रम घेत आहेत.
