नवी दिल्ली / प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अमरावतीचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष गवई यांनी राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य आणि प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्वल निकम यांचे दिल्लीतील संसद भवनात आत्मीय स्वागत केले.यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील युवा धोरण, देशातील तरुणांच्या सहभागाची गरज आणि विधी व न्याय व्यवस्थेमधील तरुणांचा वाढता सहभाग यासंदर्भात सखोल चर्चा झाली. डॉ. गवई यांनी ॲड. निकम यांना अमरावती जिल्ह्यातील युवा उपक्रमांबाबतही माहिती दिली व त्यांना भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याचे आमंत्रण दिले.डॉ. मनीष गवई हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणावर काम करणाऱ्या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत असून, राज्यातील युवा नेतृत्व विकास,रोजगार सक्षमता आणि सामाजिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी भूमिका बजावत आहेत. ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत संवाद साधून ते आपल्या कार्याला नवे दिशा देत आहेत.हा स्वागत सोहळा संसदेच्या ऐतिहासिक परिसरात घडून आल्याने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

