
अमरावतीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिवसाचे आयोजन
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक अमरावती येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अमरावती येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एनएसएस हॉल येथे दिनांक 15 जुलै रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता जागतिक युवा कौशल्य दिवस ( वर्ल्ड युथ स्किल डे) साजरा करण्यात येणार आहे , सन 2014 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंबली (UNGA) च्या घोषणेनंतर दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करण्यात येतो , हा दिवस तरुणांना रोजगार कौशल्यपूर्ण नवीनतम आणि उद्योजका करता कौशल्य सुसज्य करण्याचे धोरणात्मक महत्त्व म्हणून साजरा केला जातो , यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्य निर्देशानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील सर्व प्रशिक्षणार्थी व नजीकच्या काळात प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी व कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झालेला आहे अशा प्रशिक्षणार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून सदर राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे, विशेष कौशल्य प्राप्त , विशेष कामगिरी करिता उपस्थित उमेदवार यांचा सदर कार्यक्रमात गौरव करण्यात येईल , या कार्यक्रमात बहुसंख्य प्रशिक्षणार्थी , गट निदेशक व शिल्प निदेशक यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौ. सुधा ठोंबरे मॅडम यांनी या प्रसिद्ध पत्रका द्वारे करण्यात आले आहे