
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे सदर गर्दी व पर्यटकांच्या सुरक्षा करिता माननीय जिल्हाधिकारी, अमरावती, मा निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन चिखलदरा येथे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात डी डी आर एफ पथक तैनात ठेवण्यात आली आहे आज चिखलदरा घाट रस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एक पर्यटकाची गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीतून खाली पडलेली आहे.
गाडीमध्ये एकूण सहा व्यक्ती यामध्ये ४ व्यक्ती व २ मुलांचा समावेश होता सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चिखलदरा व ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा यांना माहिती मिळताच डी डी आर एफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले त्यांचे प्राण वाचवले त्यांना तात्काळ चिखलदरा येथे पी एस सी मध्ये उपचाराकरिता पाठविण्यात आले.जिल्हा शोध व बचाव पथकातील देवानंद भुजाडे,विशाल निमकर,भूषण वैद्य,अर्जुन सुंदरडे,महेश मांदळे सुरेश पालवे,सुरज ठाकूर,अजय आसोले यांचा समावेश आहे. भूषण वैद्य व अर्जुन सुंदर डे या कर्मचाऱ्यांना शोध व बचाव कार्य करताना पायाला दुखापत झाली आहे त्यांना आर एच चिखलदरा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.