
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजनुसार ‘बी.एस्सी. डेटा सायन्स अॅन्ड अॅनॅलिटीक्स’ हा नवीन पदवी अभ्यासक्रम 2025-26 पासून सुरु करण्यात आला आहे.हा अभ्यासक्रम मा. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, मा. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात येत आहे.सध्याच्या डिजिटल युगात डेटा सायन्स आणि अॅनॅलिटीक्स या क्षेत्रामध्ये मोठी मागणी आहे. उद्योग, शासन आणि विविध संस्था डेटा आधारित निर्णय घेत असतात. ही गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्याथ्र्यांना गुणवत्तापूर्ण व भविष्यकालीन करिअरची संधी देण्यासाठी या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्याथ्र्यांना डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, प्रोग्रामिंग, सांख्यिकी आणि व्यवसाय विश्लेषण यासारख्या आधुनिक विषयांचे सैद्धांतिक व प्रायोगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्याथ्र्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना अत्यंत प्रगत व औद्योगिक गरजांनुसार करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम AEDP (Apprenticeship Embedded Degree Program) अंतर्गत राबीविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विद्याथ्र्यांचे कौशल्य वृधींगत होण्याच्या दृष्टीने एक संपूर्ण सत्र औद्यीगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यानुभव देण्यात येणार आहे. डॉ. स्वाती शेरेकर ह्या नव्या अभ्यासक्रमाच्या समन्वयक असून प्रवेशासाठी प्रा. राजेश भोयर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संगणक विभागप्रमुख प्रा.मो. आतिक़ यांनी केले आहे. भविष्यात या अभ्यासक्रमामुळे विद्याथ्र्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केला आहे.