
पिकांना संजीवनीची गरज
नांदगाव पेठ / दिनकर सुंदरकर
अमरावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रखर उन्हामुळे पिके कोमेजून जाण्याच्या स्थितीत आली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती मात्र काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील विविध भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांना पावसाचे भरपूर पाण्याची पिकांचा गरज आहे.तर काही भागांत कोरड्या हवामानामुळे पिकांची वाढ खुंटली होती, तर काही ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे; मात्र पावसाच्या आगमनाने ही परिस्थिती बदलली जाईल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात जाग्या झाल्या आहेत.
हुमणी अळी व वन्य प्रान्यांचा हौदोस
यावर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी अळींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना जीवघेणा ठरत आहे. हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांसाठी हुमणी अळी ही शाप ठरत असल्याचे बोलल्या जात आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या हौदोसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या जात असून या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याचे दिसून येत आहे मात्र यावर उपाययोजना सरकारच्या वतीने नसल्याने शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून कधी अभय मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तर अमरवेलचे संकट सुटेना
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड देत आपली पिके सावरावी लागतात मात्र गेल्या काही वर्षापासून अमरवेल या तणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट केला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर तणनाशक फवारणी करून संपूर्ण पिक नष्ट केले आहे. मात्र आजपर्यंत यावर प्रभावी उपाय नसल्याने शेतकऱ्यांना अमरवेलचा सामना करावा लागत आहे.