
डॉ सुनील देशमुख यांच्यासह कॉँग्रेसच्या शिष्टमंडळानी पोलिस आयुक्त यांची घेतली भेट !
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहारात दिवसेंदिवस वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण खून,गुटखा,एम डी,गांजा व अन्य अमली पदार्थांची तस्करी,युवकांमध्ये वाढलेले गुन्हेगारी,अवैध धंदे , परप्रांतीयांची शरात होत चाललेली गुंडगिरी यावर अंकुश राहण्यासाठी तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी खासदार बळवंत वानखडे डॉ सुनील देशमुख,माजी पालकमंत्री यांच्यासह कॉँग्रेसच्या शिष्टमंडळासह अमरावती शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेतली. अमरावती शहर म्हणजेच अंबानगरी या शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. परंतु मागील काही काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुंजेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरात नुकताच एक पोलीस अधिकाऱ्याचा दिवसाढवळ्या काही युवकांनी खून करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. दिवसाढवळ्या एका पोलिसांचा खून होत असल्याने शहरातील नागरिकामधे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात एमडी,ड्रग,गांजा,यासारख्या अमली पदार्थाची तस्करी होत आहे. तसेच शहरात हॉटेल्सच्या नावावर अवैध हुक्का पार्लर आणि पब सुरु असून शहरात शिक्षणास येणारे अल्पवयीन तरुण तरुणी व्यसनाला लागत आहे.
शहरात एमडी या अमली पदार्थाची खुलेआम विक्री होत असून शहरातील युवक या नशेमुळे गुन्हेगारीकडे वळत आहे. तसेच शहरात बाहेर राज्यातून परप्रांतीय येऊन त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना थाटात त्यांचे व्यवसाय सुरु आहे. तसेच शहरातील सिग्नलवर असणारे लहान मुले व त्यांच्यामार्फत सिग्नलवर थांबणाऱ्या वाहतूकदारांना होणारा त्रास शहरातील वाहतुकीवर ट्रॅफिक पोलिसांचे नसणारेनियंत्रण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाला आहे याबाबत मुंबई येथे सूर असलेल्या पावसाळी अधिवेशन येथील दोन्ही सभागृहात याबाबत चर्चा झाली असून यामुळे राज्यात सुसंकृत अमरावती शहराचे नाव खराब होत आहे.तसेच अमरावती शहरातील नवसारी चौकात वाढते गुन्हेगारीचे प्रमाण पाहता नवीन पोलीस चौकी उभारण्याचे तसेच शहरातील पोलीस विभागाशी संबंधित अन्य समस्येबाबत पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासोबत सदर बैठकीत चर्चा झाली. यावर युद्धस्तरावर कार्यवाही करून शहारातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आला घालयाबाबत मास्तर प्लॅन तयार करून कार्यवाही करणार असल्याचे पोलीस आयुक्त यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. सदर बैठकीला पोलीस उपायुक्त श्री शिंदे,श्री घुघे,विलास इंगोले,माजी महापौर,बबलू शेखावर अध्यक्ष शहर काँग्रेस कमेटी बाळासाहेब भुयार,धीरज हिवसे,जयश्री वानखडे , सुनील जावरे,गजानन राजगुरे,सुशील पडोळे,गजानन जाधव अब्दुल रफिक,समीर जवंजाळ,वैभव देशमुख,निलेश गुहे आदी पाधाधिकारी उपस्थित होते.